मुलांशी हवा सहज संवाद
परवा सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्यात मिताली भेटली. एकमेकींची प्राथमिक चोकशी झाली आणि ती म्हणालो, ‘मिहीरने पार वैताग आणलाय! ‘ ‘नक्की भेटू मिताली, ये एक दिवास वेळ काढून’, मी म्हणाले. त्या संध्याकाळीच मिताली हजर झाली ‘अगं मिहीर आता आठ वर्षांचा झालाय. तिसरीतली मुलं कित्ती बोलतात. हा मात्र शाळेतून आला की गप्प! शाळेत खूप बोलतो म्हणून टीचर रागवतात! आता तूच सांग, घरी येऊन शाळत काय झालं? सांगायला नको का त्याने’? मिताली चिडून बोलत होती.
तिचं पूर्ण बोलणं शांतपणे ऐकून घेतल्यावर मी मिहीरचा दिनक्रम व त्याचा घरी आल्यावरचा आईसमवेतचा संवाद याबाबत मितालीला विचारलं. शाळेतून मिहीर साधारणत: साडेतीनच्या सुमारास घरी यायचा. घरी आल्याबरोबर
मिताली त्याला विचारायची. ‘कशी झाली रे शाळा?’
मिहीर : हं! ठीक.
मिताली : आज डबा खाल्लास की नाही? की तसाच अर्धवट घरी आणला आहेस?
मिहीर : खाल्ला पूर्ण
मिताली : होमवर्क दिलाय का आज?
मिहीर : अं… बघतो… आहे बहुतेक मॅथ्सचा…
मिताली : काय? तुला होमवर्क पण आठवत नाहीये? आधी डायरी आण जा,
साधारण या प्रकारचे संवाद मितालीच्या घरी रोज होत होते, त्यात संवादीपणा कमी असायचा, त्यामुळे बरेचदा बाद होऊन संभाषण खुंटायचे, सारखाच टीकेचा सूर, हेटाळणी, सततचे दोषारोपण यामुळे मुले मनातल्या मनात खट्ट होवून बसतात आणि त्यांच्या चिमुकल्या कोवळ्या मनाची रंगीबेरंगी कवाडं ते पालकांपुढे उघडण्यास असमर्ध ठरतात, संवाद म्हणजे ‘पालकांचे एकापाठोपाठ एक येणारे निरंतर प्रश्न आणि त्यांनी दिलेली त्याची रोजचीच शिळी उत्तरं’, हे समीकरण मुलांच्या मनात पक्के होवू लागते. मिहीर कदाचित त्यामुळेच आईशी नीटसा बोलू शकत नव्हता मुलांना प्रेम, जिव्हाळा देणं, त्यांना आपुलकीने वागवणं, त्यांच्या कलाकलाने त्यांना त्यांच्या आवडोच्या विषयावर बोलू देणं, त्यांच्याशी त्यांच्या वयाचं होवून गप्पा मारणं ही एक कला आहे. मुलांशी संवाद साधण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या माहीत असल्या की ही कला सहज साध्य होते. आंतरिक जिव्हाळ्याने फुलते. मुलांबद्दलचा आदर, सन्मान आणि मायेने बहरते.
सकाळी सहा वाजता लवकर उठून, आवरून सात-आठ तास शाळेत घालवून दमून घरी आलेल्या मुलांना खरंतर निवांत घर अनुभवायचं असतं पण शिस्तीच्या बडग्याखाली आणि क्लासेसच्या वेळा सांभाळण्याच्या कसरतीत पालकांचा मुलांशी होणारा संवाद दिवसेंदिवस त्रोटक, कृत्रिम होत जातो! मुलांना संवादी करण्यासाठी एक सुजाण पालक म्हणून आपण प्रयत्न करीत राहिले पाहिजे.
- मुलांनी आपल्याशी मनमोकळं बोलावं, मनातलं सांगावं असं वाटत असेल तर मुलांना रोज थोडा मोकळा देळ मिळेल हे आपण बघू या. (Free Play)
- मुक्त संवादाला पुरक पोषक आनंदी वातावरण मुलाला मिळेल हे बघुया. घरात मुलं मोकळेपणाने वागली, वावरली पाहिजेत.
- मुलांच्या सवडीच्या वेळी आवडीच्या गोष्टी करण्याची मुभा मुलांना दिली जाईल हे बघू या. यामध्ये मोबाइलवर गेम्स खेळणे अपेक्षित नाही, पण चित्र काढणं, कलाकुसर, ओरिगामी करणे वाद्य वाजवणे, झाडांना पाणी घालणे अशी छोटी पण मुलांना आनंद देणारी कामे मुलांना आवर्जून करू द्यावीत. यामुळे मुलांच्या मनावरचा दिवसभराचा ताण हलका होतो आणि त्यांना ‘ रिचार्ज्ड’ वाटते.
- मुलांच्या मनातील दुखऱ्या जागा, अभ्यासातले कच्चे विषय, त्यांच्या नकळत झालेल्या चुका ह्याकडे जाणीवपूर्वक काही काळ दुर्लक्ष करू या. मनमोकळ्या विश्वासपूर्ण संवादासाठी अत्यंत गरजेचे आहे. मुलांचे वय, त्यांची समज, त्यांच्या आवडीचे विषय, त्यांचे कल, त्यांची उपजत ओढ कुठे आहे? याचे भान ठेऊन संवादाची सुरुवात करू या मुलांशी संवाद साधताना जोशपूर्ण उत्साही, सकारात्मक वागणूक ठेवणे निकडीचे ठरते. मरगळलेले कंटाळलेले, थकलेले चेहरे उत्तम संवाद साधण्यासाठी बाधा ठरू शकतात हे लक्षात घेऊ या.
- मुलांशी गप्पा मारण्यासाठी स्वत:चा थोडासा वेळ राखून ठेवूया. दिवसभराच्या व्यापानंतर रात्री दहा
मिनिटे गप्पा मारून, हसत खेळत झोपायचे हा अलिखित नियम ठरवू या. मुलांना आपला दिवस कसा गेला? हे सांगूया, अगदी आपण एखाद्यावेळी कसे अडचणीत सापडलो आणि त्यावर आपण कसा मार्ग काढला? हे सुद्धा आवर्जून मुलांपर्यंत पोचवूया मुले कळतनकळत खूप गोष्टी टिपत असतात. अशा छोट्याशा प्रसंगांनी ती भावनिकदृष्ट्या सक्षम होतात हे लक्षात घेऊया
- मुलांशी गप्पा मारताना पालकांनी स्वतःच्या लहानपणीच्या गमतीजमती मुलांना आवर्जून सांगाव्यात, वर्तमानपत्रातील बातम्या, दैनंदिन घडामोडी, क्रीडा, व्यापार, आरोग्य, राजकारण इ. वैविध्यपूणं गोष्टींवरच्या चर्चेत मुले खूप समरसून जातात. मुलांचे ज्ञान तर वाढतेच पण हो ‘सामिलकी ‘ची भावना मुलांमध्ये वाढीस लागते. आपलाही मोठ्यांच्या गप्पांमध्ये स्वीकार होतोय. आपलेही मत महत्त्वाचे आहे हे मुलांना जाणवू लागते. जे संवादासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. संवाद साधताना राग, पिती, देष, निराशा, या नकारात्मक भावना बाजूला ठेवू या भावनांपेक्षा विचारांना प्राधान्य देऊया सहज, सोपे, साधे उत्साहपूर्ण, आनंदी वातावरण मुलांच्या मनाचा मनोहारी पिसारा नक्कीच उलगडेल.
(लेखिका – स्वाती बापट बालविकास प्रचोदक व समुपदेशिका आहे.)